‘ती’ लाडकी बहीण तर, आम्ही कोण? तृतीयपंथीयांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना | काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं उर्वरित अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकारच्या वतीनं अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. त्यापैकी एक योजना म्हणजे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’. राज्यभरातील महिला या योजनेसाठी अर्ज करत आहेत. अशातच आता याच योजनेवरुन मुख्यमंत्र्यांना तृतीयपंथीयांनी प्रश्न विचारला आहे. मुख्यमंत्र्यांना ‘लाडकी बहीण’ तर आम्ही कोण? तृतीयपंथीयांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर झाली आहे. तृतीयपंथीयांना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ व्हावा, आम्ही देखील समाजाचा घटक आहोत, आम्हाला देखील मतदानाचा अधिकार आहे, असं म्हणत आता तृतीयपंथीयांनी देखील या योजनेचा लाभ दिला जावा, अशी मागणी केली आहे. आम्हाला ही योजना का लागू होत नाही? असा प्रश्न या तृतीयपंथीयांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, काहीतरी केल्याशिवाय सरकार दखल घेत नाही. त्यामुळे प्रसंगी आम्ही रस्त्यावर देखील उतरू, असा इशारा या तृतीयपंथीयांनी दिला आहे.